सांगोला तालुक्यातील मौजे चोपडी या गावातील बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये आले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या दुपारी जिल्हा परिषदेमधून बाहेर पडतानाच त्यांच्या वाहनाला घेराव घालून या युवकांनी त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात मौजे चोपडी येथे ग्रामपंचायत दप्तरी नोंद असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे. सदर सभागृहात यापूर्वी वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. परंतु अलिकडील काळात सदर (सभागृहात अतिक्रमण करून यापूर्वी भंगारचे साहित्य तर सध्या व्यायामाचे साहित्य ग्रामपंचायतकडून ठेवणे आलेले असून सध्या सुंदर सभागृहाचा वापर व्यायाम शाळा म्हणून सुरू आहे. सदर सभागृह खुले करून देणेबाबत आम्ही ग्रामसेवक, सरपंच, पोलिस निरीक्षक, सांगोला, गटविकास अधिकारी सांगोला तसेच तहसिलदार सांगोला यांचेकडे गेल्या १५ ते २० दिवसापासून तकार अर्ज दाखल केलेले आहेत. परंतु, आमचे तकार अर्जाचा कोणीही कसलीही दखल आजतागायत घेतली नाही अशी त्यांची तक्रार आहे.
यावेळी धनाजी तोरणे, दिलीप तोरणे, तायप्पा तोरणे, सिद्धार्थ तोरणे, जानकीदास तोरणे, संतोष तोरणे, भास्कर तोरणे, महादेव तोरणे, समाधान तोरणे, रामकिशोर तोरणे, किशोर तोरणे, शिवाजी तोरणे यांच्यासह चोपडी गावातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.