सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावली होती. 21 जुलै 2023 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद आले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे या आल्या, त्या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिलीच नियोजन समितीची बैठक होती. जिल्हा नियोजन समिती मध्ये नवीन सदस्य अथवा अधिकारी आला आला तर त्यांचा पालकमंत्री सत्कार करतात, यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नियोजन अधिकारी पवार यांनी स्वागत करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली परंतु पालकमंत्र्यांचे लक्ष दुसरीकडे होते त्यामुळे हे दोन्ही स्वागताचे सत्कार राहूनच गेले.