सोलापूर : सोलापूरच्या जुळे सोलापूर भागातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे युवराज राठोड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला त्यामुळे युवराज राठोड हे भाजप प्रवेश करणार का या चर्चेला आता उधान आले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांच्या उपस्थितीत आणि कार्यक्रम झाले रात्रीच्या सुमारास माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या एका कार्यक्रमाला बावनकुळे यांनी उपस्थिती लावली त्या स्टेजवर युवराज राठोड यांनी बावनकुळे यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा नेते मनीष देशमुख, माजी नगरसेवक सुभाष शेजवळ, माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, हेमंत पिंगळे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
राठोड यांना भाजप प्रवेश बाबत विचारले असता त्यांनी केवळ हे भेट आणि सत्कार होता असे सांगून पुढे बोलण्यास नकार दिला. युवराज राठोड यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा जुळे सोलापूर तसेच सैफुल भागात मोठा जनसंपर्क आहे. भविष्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास निश्चितच या भागात भाजप आणखी मजबूत पक्ष बनेल असे बोलले जात आहे.