“आला रे आला…, युवराज आला..! राठोड यांना शहरी भागात प्रचंड प्रतिसाद
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांच्या पदयात्रेला या मतदारसंघातील शहरी भागात प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या मतदारसंघातील नेहरूनगर, कमला नगर, सुशील नगर, बहुरूपी नगर येथील पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांमधून “आला रे आला, युवराज आला” असा एकच नारा ऐकण्यास मिळाला.
यावेळी माध्यमांशी बोलताना “हिंदू मुस्लिम शीख इसाई, हम सब है भाई भाई” याप्रमाणे माझा प्रचार सुरू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातून सुद्धा मला मोठा पाठिंबा मिळतो आहे. मतदारसंघाचे मागील दहा वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराने किती विकास केला हे सध्या दिसत आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन अटळ असल्याचे दावा त्यांनी केला.