सोलापूर : बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र…,श्री सिद्धेश्वर महाराज की जय भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात केंगनाळकर कुटुंबीयांनी आपल्या निवासस्थानी दोन नंदीध्वजाचे पूजन करण्यात येऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.
ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचे पूजन घरोघरी होत आहे. सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास १५० ठिकाणी पूजन होते़. शहरात सरावाचे १८ नंदीध्वज असून तीन हजार ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते.
न्यू पाच्छा पेठेतील केंगनाळकर यांच्या वाड्यात पाच नंदीध्वजाची पूजा करण्यात आली. यावेळी विधिवत पूजेसह सिद्धरामेश्वरांची भक्तीगीते वाजवण्यासोबत सामूहिक आरती करण्यात आली़.
के के प्रतिष्ठानचे सोमनाथ केंगनाळकर, त्यांच्या पत्नी सुशीला केंगनाळकर, लहान बंधू मल्लिकार्जुन केंगनाळकर, त्यांच्या पत्नी माया केंगनाळकर, हेमंत पिंगळे, बसवराज केंगनाळकर, परिमल बोळकोटे, गुरू बुरकुले, निलेश केंगनाळकर, नितीन केंगनाळकर, भाग्यश्री डोणे, सिद्राम तंबाके, महादेव बुरकुले, नागनाथ चमके, प्रकाश म्हेत्रे, पृथ्वीराज फुटाणे यांच्यासह केंगनाळकर कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमनाथ केंगनाळकर म्हणाले, १९६० पासून केंगनाळकर कुटुंब घरी नंदीध्वज पूजन करतो, ही आमची तिसरी पिढी आहे, अनेक ठिकाणी केवळ एका नंदीध्वजाची पूजा होते मात्र आम्ही पाच नंदीध्वज पूजतो. ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वरांवर आमची अखंड भक्ती आहे. आमची पुढील पिढी ही सेवा अखंड ठेवेल असा विश्वास व्यक्त केला.