… तर कुत्र्यांची नावे देवेंद्र आणि नरेंद्र ठेवू मराठा समाज का झाला आक्रमक ; भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर टीकेची झोड ; सोलापुरातून ही पोस्ट
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक वरील पोस्ट वरून सध्या महाराष्ट्र मध्ये मराठा समाजातून अतिशय टिकेची झोड उठली आहे.
आमदार भारतीय यांनी आपल्या फेसबुकवर निवडणुकी च्या व्यवस्थापनाची धावपळ : कधी पुणे, तर अचानक संभाजीनगर ! तर लगेच हिंगोली !! आणि ठाणे !!! निवडणुकी चा काळ !!! हा असाच !!!! पण काल गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तवार घरी एक पाहुणा अवतरला!!! थेट पटियाला पंजाब मधून !!! शंभु !!! होय शंभूच !!!! आणि २४ तासात आलेल्या या पाहुण्याने अख्खं घर व्यापून टाकलंय !!! …. आणि घरच्या चौघात एक पाचवा आला !!! शंभु चा स्वागत !!!! अशी पोस्ट टाकली आहे.
एका कुत्र्याला शंभू हे नाव दिल्याने आमदार भारतीय हे मराठा समाजाचे लक्ष झाले आहेत. सोलापुरात सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी तर भारतीय यांना आमच्या नादी लागू नका असा इशारा देत जर भारतीय यांनी ही पोस्ट डिलीट नाही केली तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज कुत्र्यांना देवेंद्र आणि नरेंद्र असे नाव ठेवेल असा इशारा दिलाय.
तर संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी तर आमदार श्रीकांत भारतीय यांच्याबाबत आपल्या फेसबुक वर ही पोस्ट ठेवली आहे ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.