सोलापूरच्या बेरोजगारीचा कलंक पुसेन ; राम सातपुते यांचा अजूनही सुशीलकुमार शिंदेंवरच निशाणा ; राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट
सोलापूर : महायूतीचे उमेदवार राम सातपुते यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे शफी इनामदार या प्रमुख नेत्यांनी सातपुते यांचे स्वागत केले आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राम सातपुते यांनी यावेळी बोलताना मागील दहा वर्षात सोलापुरात झालेल्या विकासावर भाष्य करत पुन्हा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली. येथील स्थानिक नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्रीपद, ऊर्जा मंत्री पद गृहमंत्री पद भूषवले, किती विकास केला याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आव्हान करत साधं विमानतळ त्यांना सुरू करता आले नाही, पण माझा शब्द आहे सोलापूरकरांनी संधी दिल्यास खासदार या नात्याने सोलापुरातील बेरोजगारीचा कलंक मी निश्चितच पुसून काढेल असा विश्वास व्यक्त केला.
शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, राम सातपुते तुम्ही कोणतीही काळजी करू नका सोलापुरातील संपूर्ण राष्ट्रवादी तुमच्यासाठी कामाला लावेन, तुमच्या विषयात निश्चितच राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल.
आनंद चंदनशिव म्हणाले राम सातपुते यांची अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे, विधानसभा असेल जिल्हा नियोजन समिती असेल त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सभागृहात भाषणे केल्याचा गौरव केला.
जुबेर बागवान म्हणाले महायुती मधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल. सोलापुरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि हे बेरोजगार कायम स्थलांतरित होत राहतात परंतु आपण खासदार झाल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न निश्चित सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी महाराष्ट्रातील तीनही महायुतीच्या घटक पक्षांनी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास दिला आहे. त्या विश्वासास पात्र राहून आपण सर्वांनी एक दिलाने सोलापुरात काम करू राम सातपुते यांना निवडून आलो असे आवाहन केले.
यावेळी वसीम बुऱ्हान, महीला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, प्रदेशच्या सायरा शेख, समन्वयक शशिकला कस्पटे, प्रिया पवार, कांचन पवार, ज्योति शटगार, सरचिटणीस प्रमोद भोसले, प्रदेशचे बसवराज बगले, युवकचे सुहास कदम, चेतन गायकवाड, राजू बेल्लेनवरू यांच्यासह महिला पदाधिकारी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.