राम सातपुतेंचा पराभव या नेत्यांमुळेच ; भाजप कार्यकर्त्याने फोडले यांच्यावर खापर
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते यांचा पराभव झाला आहे. पराभव मागील अनेक कारणे समोर येत आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 19 स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितली होती. भाजपच्या वरिष्ठांनी या सर्वांना डावलून माळशिरसचे आमदार राम सातपुतेना उमेदवारी देत स्थानिक इच्छुकांना धक्का दिला होता.
सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या दिलीप शिंदे या पदाधिकाऱ्याने अनेक खुलासे केले. सोलापूर लोकसभेत स्थानिक उमेदवार नसल्याने पराभव झाल्याच मुख्य कारण सांगितले. श्रीकांत भारतीय यांनी राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती,त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली आहे.
सोलापुरातील भाजपच्या शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी ही मागणी दिलीप शिंदेंनी केली आहे.