सोलापुरात भाजपचा झेंडा उलटा फडकला ; पराभवाचे चिंतन नाही उलट जल्लोषच झाला
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत देशांमध्ये भाजपला जनतेने बॅकफूटवर टाकले स्वबळावर 400 पार ची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची यावेळी चांगलीच अडचण झाली आहे.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला दोन्हीकडे पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक रोखली. या पराभवामुळे भाजपच्या अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. सोलापूर शहरात जरी मतदान चांगले असले तरी ग्रामीण भागात मात्र भाजप पूर्णपणे बॅक फुटवर गेल्याचे पाहायला मिळते.
निवडणुकांमध्ये उमेदवाराचा पराभव झाला की, पराभवाची नैतिकता स्वीकारून अनेक पदाधिकारी आपले राजीनामे देतात. त्या पराभवाचे चिंतन केले जाते. परंतु सोलापुरात जय साळुंखे वगळता कोणीही राजीनामा दिला नाही. तसेच पराभवाचे चिंतन झाले नाही पण देशात एनडीए बहुमतात आल्याने जल्लोष करण्यात आला. जल्लोष करताना मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचा उलटा झेंडा फडकवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.