धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा जिंकला ; अरुण तोडकर यांचे शब्द खरे ठरले ! शिंदे बंधूंना मतदाराने बनवले ‘मामा ‘
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा माढा हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहेत. माळ्यामध्ये तुतारी जोरदार वाजले असून धैर्यशील मोहिते पाटील हे सुमारे सव्वा लाखाच्या फरकाने विजय झाले आहेत. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. मोहिते पाटील यांना सहा लाख 14 हजार 295 तर निंबाळकर यांना चार लाख 94 हजार 828 मते मिळाली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांनी निवडणुकीपूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी विजयी होतील असा दावा केला होता तो या निकालाने खरा ठरला आहे.
माढा मतदारसंघात पाचही आमदार विरोधात होते तरीही या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे या निवडणुकीच्या निकालानंतर मोहिते पाटील जिकडे विजय तिकडे असे गणित पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार होते परंतु त्यांचा सुमारे 85000 मताच्या फरकाने पराभव झाला होता. त्यावेळी भाजपसोबत गेलेले मोहिते पाटील यांनी एका माळशिरस तालुक्यातून तब्बल एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य दिले होते.
मोहिते पाटील विरोधात असल्याने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माळशिरस आमदार राम सातपुते तसेच मान फलटण येथील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपला विजयाची गॅरंटी दिली होती पण जनतेने भाजपला यावेळेस स्पष्ट नाकारले. आता तर शिंदे बंधू यांना जनतेने ‘ मामा’ बनवले अशी मजेशीर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान अरुण तोडकर म्हणाले, रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी निवडून आणले परंतु त्यांनी आमच्या विरोधकांना जाऊन मिळाले, कोणताही निधी त्यांनी माळशिरसला दिला नाही त्यामुळे नाराजी वाढली. विजयसिंह मोहिते पाटील यांचे वीस टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हे सूत्र असल्याने जनता त्यांच्यासोबत राहिली आहे. यावेळेस सुद्धा माळशिरस तालुक्याने सुमारे 80 हजारा हून अधिक मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यांच्या विजयात सुद्धा मोहिते पाटील घराण्याचा मोठा वाटा असल्याचे तोडकर म्हणाले.