आमदार प्रणिती शिंदे यांनी दमदाटी केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
लोकसभा निवडणुकीचे काम करत असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत शाब्दिक चकमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
पूर्व भागातील स्वातंत्र्यसैनिक नगर, कर्णिक नगर परिसरात काँग्रेसचे काम करणारा बाबुराव क्षीरसागर याला फोन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी दम भरला होता. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रचंड व्हायरल झाली.
या प्रकारानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होऊन काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव क्षीरसागर, सुशील नाटकर आणि सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी अजिंक्य कटाप, सुदर्शन क्षीरसागर, देविदास शिंदे, अमोल जाधव, गणेश साळुंके, चंद्रशेखर सरवदे, विकास धायफुले, अमित हिबारे, श्रेयस कटारे, साईनाथ क्षीरसागर, अक्षय कारंजे, योगीनाथ मिनकेरी, बालाजी मिनकेरी, गणेश बनसोडे, राकेश यन्नम, आदित्य पुकाळे, विनय हंचाटे, रोहन पतंगे, शार्दुल कोठे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
काय होती ऑडियो क्लिप पहा