Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आईच्या पार्थिवाला लेकीनं दिलेला शब्द पूर्ण केला ; मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नियुक्ती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2025
in Success
0
आईच्या पार्थिवाला लेकीनं दिलेला शब्द पूर्ण केला ; मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नियुक्ती
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आईच्या पार्थिवाला लेकीनं दिलेला शब्द पूर्ण केला ; मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नियुक्ती

सोलापूर : वडिलांचे छत्र हरपलेलं.., आईला सुद्धा काळाने हिरावून नेले, जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा तिच्या लेकीने “आई, तू आम्हाला सोडून गेलीस, सरकारी नोकरी मिळवण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करून दाखवते” हा शब्द त्या लेकीने आज पूर्ण करून दाखवला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर तिची नियुक्ती झाली आहे.

ही कहाणी आहे अलका दयानंद कांबळे या लेकीची. सोलापूर पासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात कांबळे कुटुंब राहत होतं. मुलं लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. आई आशा ही आपली तीन मुलं अनुप आणि अजित मुलगी अलका या तिघांना घेऊन राहत होती परंतु काळाने या कुटुंबावर घाला घातला. दुर्दैवी एका अपघातात आशा हिचा मृत्यू झाला त्यामुळे या तीनही लेकरांवरील आई वडिलांचे छत्र हरपले.

जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा ही तीनही लेकरांनी टाहो फोडत “आई, आम्ही सरकारी नोकरदार व्हावे ही तुझी इच्छा होती ती पूर्ण करून दाखवतो” असा शब्द त्यावेळी दिला होता.

त्यानंतर हे तीनही भावंडे मामा लक्ष्मण कटारे यांच्याकडे सोलापुरात राहायला आले. मामांनी शेजारी जागा घेऊन दिली. त्या ठिकाणी दोन्ही भावांनी कष्ट करून घर बांधले. बहीण अलका हिने या दोन्ही भावांना मोठ्या बहिणीच्या नात्याने सांभाळून घेतले. तिची इच्छा पोलीस व्हायची होती परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ती पोलीस होऊ शकली नाही पण तिने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.

विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा देत गेली अखेर तिला यश आले. मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर अलका हीची आज बुधवार नऊ एप्रिल रोजी निवड झाल्याचे पत्र प्राप्त होताच कांबळे आणि कटारे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. अलकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आईच्या अंत्यविधीला तिच्या पार्थिवावर तिने दिलेला शब्द अखेर पूर्ण केल्याचा आनंद सर्वांनाच आहे अभिनंदन या लेकीच्या कष्ट आणि परिश्रमाला.

Tags: Alka kambleJobMumbai municipal corporationयशोगाथा
SendShareTweetSend
Previous Post

बोधिसत्व मध्यवर्तीची महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; जयंती काळात ही कामे तातडीने करा

Next Post

क्या बात है गायकवाड साहेब ! या कुटुंबाच्या जीवनात आणला तुम्ही आशेचा ‘ किरण’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात महिला सावकाराच्या विरोधात गुन्हा ; उत्तर तालुक्यातील या गावातील आहे सावकार

क्या बात है गायकवाड साहेब ! या कुटुंबाच्या जीवनात आणला तुम्ही आशेचा ' किरण'

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995680
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group