मार्डीमध्ये जनावरांच्या पाणपोईची सुरुवात ; या प्रतिष्ठानचा उपक्रम
मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथे निर्मल हृदय दादा प्रतिष्ठान चे संस्थापक संजय खरटमल यांच्या वतीने मार्डी परिसरातील मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता मार्डी -होनसळ रस्त्यावरती हॉटेल राम लखन या ठिकाणी महाराष्ट्राचे शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते संत कक्कया महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणपोई जनावरांसाठी खुली करून दिली.
यावेळी शिवरत्न शेटे म्हणाले, मनुष्याला व्यक्त होता येत परंतु जनावरांना व्यक्त होता येत नाही हे ओळखून मार्डी येथील संजय खरटमल यांनी हे महान कार्य केले आहे. ते कार्य अतिशय उल्लेखनीय असून, यापूर्वी देखील त्यांनी नरोटेवाडी, मार्डी, नान्नज रस्ता, मार्डी कारंबा रस्ता या ठिकाणी जनावरांच्या पाणपोई सोय केलेली आहे.
यावेळी सेवालाल नगरचे माजी सरपंच संजय वडजे, बाळासाहेब पाटील, शिवाजी सोनार, युवराज पवार, जगन्नाथ काशीद, भगवान कदम, प्रशांत काशीद, दादा पाटील, अरुण महापुरे, लखन वडजे, राम वडजे, पिंटू सुर्ते व प्रतिष्ठानचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.