सोलापूरच्या भाजपमध्ये अखेर पेटले रे बाबा ! ये तो होना ही था ! शहराध्यक्ष -सरचिटणीस मध्ये सोशल वॉर
सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी देण्यात आलेल्या पासेस वरून सोलापूर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यामध्ये आता सोशल वॉर सुरू झाले आहे. विशाल गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर काळे यांच्यावर तीव्र अशी नाराजी व्यक्त करत ही शोकांतिका असल्याचे म्हटल आहे.
शोकांतिका ……
देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्रजी मोदी म्हणजे आपले दैवत . आपल्या नेतृत्वाला जवळून पाहण्याची इच्छा . त्यात आपण सरचिटणीस म्हटले तर आपल्याला संधी मिळणार हे डोक्यात पक्के पण हा सगळा भ्रमनिरास च ..
रात्री भाजपा शहर अध्यक्षांनी वाँरीअर्स चे पास हातात दिले . त्यावेळी माझा सरचिटणीस चा पास कुठे ( यासाठी दिवसातून 3 वेळा कॉल केला पण रिसिव्ह नाही ) असे विचारले तर हाच पास असे उत्तर दिले . अध्यक्ष बोलले म्हणजे अंगात 7 हत्तीचे बळ आले .
रात्री 9 वाजता हे पास देताना व्ही व्ही आय पी च्या मागे खास परवानगी काढून आपल्या लोकांची व्यवस्था केली असे मिरवून सांगितले .जेव्हा कार्यक्रम स्थळी पोहोचलो तेव्हा पोलिसानी हे कुठले पास फेकून द्या असे उंच स्वरात सांगितले . मी सरचिटणीस असूनही माझ्या बाबतीत असा अनुभव . स्वतःच्या कार्यकारिनीतील सरचिटणीस ला तुम्ही फसवले ( जाणून बुजून ).
जे पक्ष हितासाठी काम करतात ते सगळे कार्यकर्तेना हवेवर सोडून देऊन स्वतःच्या बगलबच्याना व्ही व्ही आय पी पास दिले गेले या गोष्टीसाठी शहर अध्यक्ष चा निषेध च . अनेक भाजपा चे पदाधिकारी यांच्यावर हा अन्याय आहे . कॅबिनेट पदी पक्षात पद असनुही हा अन्याय होतो याला वाचा फोडावी लागणार . कारण पासेसची यादी शहर अध्यक्ष प्रशासनाकडे पाठवितात . मी किमान हे चुकीचे झाले एव्हढे व्यक्त होतोय खरे तर असंख्य कार्यकर्ते आहेत्या त्यांच्या पण याच भावना आहेत .
पक्षाचे काम करताना , जबाबदारी ने काम करा असे सांगितले जाते . पण जिथे पद म्हणून रिस्पेक्ट हवा तिथे खड्या सारखे फेकणारे अध्यक्षांची कार्यशैली संशय निर्माण करते .
असो आमच्या विश्वनेत्याची सभा सेक्टर 2 मध्ये बसून तमाम जनतेसोबत ऐकण्याची संधीचे आम्ही सोने केले ….
|| विशाल गायकवाड ||
सरचिटणीस – भाजपा सोलापूर शहर