सोलापूर : राज्याची पंचायत राज समिती मंगळवारपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता ही समिती सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली. आमदार संजय रायमूलकर हे समितीचे अध्यक्ष आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील या प्रमुख अधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले.
या समितीतील आमदार विक्रम काळे हे आक्रमक शैलीत दिसून आले समितीचे सदस्य सभागृहात दाखल होताच जिल्हा परिषदेचा कर्मचारी बोलण्यास सुरुवात केला मात्र आमदार काळे यांनी त्याला हटकले, एवढी गडबड काय आहे अजून अध्यक्ष बसायचे आहेत, सर्व सदस्य येत आहेत. म्हणून आपला आक्रमकपणा त्यांनी दाखवला. यानंतर सर्व आमदारांना पुष्पगुच्छ सह सोलापूरी चादरी भेट देण्यात आल्या.
या चादरीचा बंडल जेव्हा आमदार काळे यांच्या हाती पडल्या तेव्हा त्यांनी या बंडलमध्ये चादरी आहेत म्हणून सांगा सर्वांना, अन्यथा त्याचा वेगळा अर्थ निघेल म्हणून प्रशासनाला सूचना केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या स्वागताला मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी गेले त्यांनी त्यांना बुके दिला जेव्हा चादरीचा बंडल स्वामी देत होते मात्र त्यांनी सदाभाऊ खोत यांनी तो स्पष्ट नाकारला.
सीईओ स्वामी यांनी विनंती केली तरीही सदाभाऊंनी चादरीचा बंडल घेतला नाही त्यानंतर सर्वांचे स्वागत करून पंचायत राज समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.