सोलापुरात शिवसैनिकांनी नितेश राणे यांच्या ताफ्यावर कोंबडी चोर घोषणाबाजी ; कोंबड्याचे पोस्टर दाखवले !
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सात रस्ता चौकातील त्यांचे स्वागताचे पोस्टर महानगरपालिकेच्या पथकाने काढले तसेच जेव्हा ते विमानतळावरून बाहेर पडले विमानतळाच्या प्रमुख गेट समोर शिवसेना उपशहर प्रमुख संतोष घोडके, उपशहर प्रमुख विकी खंडागळे, शाखाप्रमुख किरण मिश्रा, शिवसैनिक प्रदीप गायकवाड या शिवसैनिकांनी नितेश राणे यांच्या गाडीला कोंबड्याचे पोस्टर दाखवले आणि यावेळी या शिवसैनिकांनी कोंबडी चोर अशी जोरदार घोषणाबाजी केली.