सोलापूरचे जलतरणपट्टू आदित्य गिराम यांना शिवछत्रपती पुरस्कार प्रदान
पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती स्टेडियम येथे सोलापूरचे सुपुत्र आदित्य अनिल गिराम यांना स्विमिंग डायव्हिंग या क्रीडा प्रकारात राज्याचा मनाचा सर्वोच्च शिव छत्रपती राज्य स्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
3 लाख रुपये, सन्मान चिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ इतर मंत्री व प्रतिष्ठित नागरीक यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी आदित्यचे कुटुंबीय हजर होते. या पुरस्काराने सोलापूरचे क्रीडा जगताचा बहुमान झाला आहे. खेळाडू म्हणूनच सोलापूरला हा सर्वोच्च राज्य शासनाचा पुरस्कार लाभला आहे. याबद्दल क्रीडाप्रेमी, आदित्य गिराम यांचे मित्र,नातेवाईक , यांनी त्यांचे अभिनंदन केले .