सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी भेटी देत कामांची पाहणी केली. अनेक कामांवर समाधान व्यक्त करत दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. या भेटीत जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे, रस्त्याची कामे पाहिली.
माळशिरस पंचायत समितीच्या कार्यालयात सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला. माळशिरस तालुका 99 टक्के प्रगतीपथावर असल्याबाबत बऱ्यापैकी समाधान व्यक्त केले आणि शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासह सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची व्हावीत एवढीच माझी इच्छा आहे. कुठलाही लाभार्थी कुठल्याही लाभापासून वंचित राहू नये याची काळजी खबरदारी आपण घेण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी गटविकास अधिकारी विनायक गुळवे,
अतिरीक्त गटविकास अधिकारी मोरे, कक्ष अधिकारी कदम, लघुपाटबंधारे उप अभियंता सोनवणे, लपा विभागाचे रामदास गुरव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.