सोलापूरच्या किसन जाधव यांनी घेतली पार्थ पवारांची भेट ; सादर केला कार्याचा अहवाल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराकडून पुणे येथील जिजाई निवासस्थानी पार्थ पवार यांचं प्रतिमा शाल पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, शहर सचिव अमोल जगताप शहर संघटक हुलगप्पा शासम, शहर संघटक ऋषी येवले, पवन बेरे आदी उपस्थित होते.
यावेळी किसन जाधव यांनी सोलापुरातील विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात पार्थ पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच सोलापूर शहराच्या विकासासाठी अजित पवारांनी भरघोष निधी उपलब्ध करून दिला या कार्याचा अहवाल देखील किसन जाधव यांनी पार्थ पवार यांना दाखविला, तेव्हा त्यांनी संपूर्ण अहवाल पाहिला.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या बळकटीसाठी संघटनात्मक बांधणी करा अशा सूचना देत सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा पार्थ पवार यांनी केली.