सोलापूर महापालिकेत आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
सोलापूर — 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथे आज महापालिकेचे आयुक्त शीतल – तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या आयुक्त यांनी भारताचे संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली.
प्रतिवर्षेप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त निखील मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपयुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, संभाजी कांबळे,सारिका अकुलवार, श्रीमती रूपाली कोळी, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी, विजयकुमार राठोड,राजेश परदेशी, अविनाश वाघमारे, नीलकंठ मठपती, रामचंद्र पेंटर, लक्ष्मण दोन्तुल, युवराज गाडेकर, डॉ.मंजिरी कुलकर्णी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.