Saturday, July 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनो ! चला आता विमानातून मुंबईला ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; या जोडीच्या पाठपुराव्याला यश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 August 2025
in Airport
0
सोलापूरकरांनो ! चला आता विमानातून मुंबईला ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; या जोडीच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
872
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरकरांनो ! चला आता विमानातून मुंबईला ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; या जोडीच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे – मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरिता सोलापूर शहरातून मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती. परंतु सोलापुर – मुंबई – सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती. उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अनेक अडथळे येत होते.

यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर – मुंबई – सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून ठरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती.

यानंतर सोलापूर – मुंबई – सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना दिले होते. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.
————-

काय आहे व्हायबिलिटी गॅप फंडिंग ?

विमानसेवा कायमस्वरूपी सुरू रहावी आणि प्रवाशांच्याअभावी विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून ती बंद होऊ नये याकरिता राज्य शासनाकडून संबंधित विमान कंपनीला प्रत्येक तिकिटामागे देण्यात येणाऱ्या ठराविक रकमेला व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणण्यात येते.
——–

गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेले सोलापूर उद्योगविश्वाच्या नकाशावर लवकरात लवकर यावे आणि सोलापुरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगारांची निर्मिती व्हावी या हेतूने सोलापूर – मुंबई – विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नांना यश आले आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुण इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याचे प्रमाण या निर्णयामुळे थांबणार आहे. सोलापूर – मुंबई विमानसेवेसाठी सकारात्मक निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांचे समस्त सोलापूरकरांतर्फे आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Tags: @Hotgi road airport#Solapur airport
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र दादांच्या ड्रीम कार मधून पालकमंत्र्यांची सफर ; जयभाऊंशी जमली जोरदार गट्टी

Next Post

कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990229
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group