दिलीप माने, शेळके, पाटील, मार्तंडे यांचे अर्ज दाखल ; बाजार समिती साठी कुणी कुणी केले अर्ज दाखल
सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून 19 जणांनी अर्ज दाखल केले, सहकारी संस्था महिला राखी मधून दोन, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मधून तीन, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती दोन, ग्रामपंचायत सर्वसाधारण नऊ, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल एक, व्यापारी प्रतिनिधी 9, हमाल तोलार प्रतिनिधी 5 असे एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार तथा माजी चेअरमन दिलीप माने, बाळासाहेब शेळके, हरीश पाटील, अविनाश मार्तंडे, राजशेखर शिवदार, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, राजेंद्र सुपाते, बाळासाहेब पाटील, केदार उंबरजे भीमाशंकर रमणशेट्टी, धणेश आचलारे, संतोष पवार, केदार विभुते अन्नप्पा सत्तूबर, इंद्रजीत लांडगे, सिद्धाराम हेले अशा प्रमुख त्यांनी उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक असून आमदार विजयकुमार देशमुख हे अर्ज दाखल करणार का याकडे लक्ष लागले असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे सुद्धा यावेळी बाजार समितीवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजले.











