अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर : सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा दिवस राज्य सरकारने शिवस्वराज्य दिन सोहळा म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शिवस्वराज्य गुढीचे पूजन झाले तेव्हा सूत्रसंचालक जयकुमार गोरे यांच्या कार्याचे कौतुक करताना दिसून आले तेव्हा लगेच जयकुमार भाऊंनी त्याकडे हात करून माझे कौतुक नको रे, आपल्या राज्यांचे कार्याचा गौरव कर असे म्हणून राज्यांच्या पुतळ्याकडे बोट दाखवले.
त्यानंतर सर्व स्टेजवर गेले तेव्हा आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हे आले त्यावेळी लगेच त्यांनी पाहिले राजांना अभिवादन करून या म्हणून सुचविले.
या सोहळ्याला स्वानंद म्युझिकल ग्रुप यांच्यावतीने शिवरायांची बहारदार गीते सादर करण्यात आली. एक गीत झाल्यानंतर गायक थांबले मात्र पालकमंत्र्यांना त्यांचा आवाज इतका आवडला की त्यांनी दुसरे गाणे गायला सांगितले. कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः गोरे यांनी भरभरून दाद देत त्यांचे कौतुक व्हावे म्हणून सर्वांना टाळ्या वाजवण्यास सांगितले. एकूणच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा हजरजबाबीपणा यावेळी दिसून आला.