सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष
सोलापूर : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये सोलापुरात प्रचंड अशी गटबाजी पाहायला मिळत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यात कुठेही देशमुख आमदार पाहायला मिळत नाहीत. सुभाष बापू असतात मात्र विजय मालक दिसत नाहीत.
सोलापूर शहराच्या राजकारणात पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचं वर्चस्व राहत असल्याने दोन्ही देशमुख नाराज असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे केवळ वर्षभरातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी झटलेल्या नरेंद्र काळे यांचे शहराध्यक्ष पद पक्षाने काढून ज्येष्ठ नेत्या रोहिणी तडवळकर यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. तेव्हापासून तर शहर उत्तर मधील विशेषतः मालक आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे चर्चा आहे.


पक्षाने प्रथमच महिलेकडे अध्यक्ष पद दिल्याने त्याचे स्वागत झाले तसेच संघाच्या कार्यकर्त्याकडे अध्यक्ष पद आल्याने पक्षावर नाराज असलेले जुने आणि संघाचे कार्यकर्ते आता चांगलेच सक्रिय झाले आहेत.
एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे शहर उत्तर मधील मालकांच्या कार्यकर्त्यांना मात्र रोहिणी ताई पचत नसल्याचे दिसत आहे. त्या शहराचे अध्यक्ष होऊन महिनाभर झाले पण शहर उत्तर मधील एकाही कार्यकर्त्याने आपल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचा फोटो किंवा नाव घातले नाही. एका तर पोस्टरवर अध्यक्ष म्हणून जाणीवपूर्वक नरेंद्र काळे यांचेच जाणीवपूर्वक छापण्यात आले होते.
नुकताच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा झाला. त्यावेळी उत्तरचे मंडल अध्यक्ष यांनी दांडी मारली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली तिरंगा यात्रा असो की पुणे येथे पार पडलेली पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेला उत्तरच्या मंडळ अध्यक्षांनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले. पक्ष या बेशिस्तिकडे लक्ष देणार नाही का असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.