Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 December 2025
in political
0
सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती
0
SHARES
564
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

सोलापूर :
सोलापूरच्या दोन देशमुख आमदारांमध्ये कायमच “तू भारी की मी भारी” यावरून कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळायचे. निवडणुका आल्या किंवा वरिष्ठ नेते आले तर तेवढेच वरून वरून ते एकत्र दिसायचे परंतु नंतर एकमेका विरोधात कुरघोड्या असायच्या. पण आता हेच देशमुख आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीपासून एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोलापुरातील आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी मधील राजकीय समीकरणे प्रचंड बदलली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे झाले. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यातच शहर मध्य मधून भाजपचे आमदार म्हणून देवेंद्र कोठे निवडून आले.

आणि त्यानंतर अचानक नरेंद्र काळे यांचे शहराध्यक्ष पद काढून रोहिणी तडवळकर यांच्याकडे देण्यात आले.

बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी विजय देशमुख यांच्याशी हात मिळवणी करत पॅनल उभे केले, तेव्हापासून हे दोन्ही नेते कायम एकत्र दिसत आहेत. एकमेकांच्या घरी जाणे, कार्यालयात जाणे, कार्यक्रमाला जाणे चालू आहे.

मनीष देशमुख यांच्या वाढदिवसाला विजयकुमार देशमुख यांनी स्वतः त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विजयकुमार देशमुख यांचे बरेच कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गेले, असे पहिल्यांदाच घडले असेल नंतर सुभाष देशमुख यांनी दिवाळीचा फराळ कार्यक्रम आयोजित केला. तेव्हाही विजय देशमुख यांचे सर्व समर्थक कार्यकर्त्यांनी फराळाला आवर्जून उपस्थिती लावली तसेच सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सामूहिक विवाह सोहळ्याला सुद्धा विजय देशमुख समर्थक कार्यकर्त्यांचा पुढाकार दिसून आला.

एकीकडे विजय देशमुख यांच्यासह त्यांचे समर्थक हे सुभाष देशमुख यांच्या सोबत मनापासून एकत्रित झाले असताना दुसरीकडे सुभाष देशमुख यांचा कार्यकर्त्यांमध्ये मात्र खुचडे राजकारण दिसते.

शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज पूजन ठेवून सर्वांना स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले होते त्यांनी सुभाष देशमुख यांना घरी जाऊन निमंत्रण दिल्याचे समजले. बापूंच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनाही त्यांनी या कार्यक्रमाला बोलावले होते पण नरेंद्र काळे यांना शेवटी नाराज व्हावे लागले. सुभाष देशमुखसह चिरंजीव मनीष देशमुख हे तर आलेच नाहीत पण सुभाष देशमुख यांचा समर्थक एकही कार्यकर्ता या कार्यक्रमाला दिसला नाही हे या दोन देशमुखांच्या मनोमिलनचे दुर्दैव म्हणावे लागेल. बापूंना नरेंद्र यांच्यापेक्षा वडाळ्याच्या काका साठे यांचा कार्यक्रम महत्वाचा वाटला असेल. काळेनी बराच वेळ बापूंची वाट पाहिली.

सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी दोन देशमुख एकत्र गाडीतून अभिवादन करण्यासाठी आले. यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे सोलापुरात वाढते वर्चस्व पाहता स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन देशमुख नेते एकत्रित आलेत का असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

आगामी महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे. दोन्ही देशमुखांवरील नाराज कार्यकर्ते हे गोरे, कल्याणशेट्टी अन् कोठे यांच्या गटात आहेत.
नाराजांमध्ये सुरेश पाटील, नागेश वल्याळ, बिज्जू प्रधाने, शोभा बनशेट्टी, अशोक निंबर्गी, इकडे श्रीनिवास करली, राजेश काळे, राजेश्री चव्हाण असे अनेक जण आहेत.
पण या दोन देशमुखांनी आपल्या मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यांना कधी भेटण्याचा प्रयत्न केला आहे का? त्यांना संपर्क केला आहे का? नाराजी दूर करून पुन्हा आपल्या सोबत घेतल्यास त्यांचीच ताकद वाढणार आहे.

Tags: #MLA Vijay deshmukhBJPMLA Subhash deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

Next Post

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999380
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group