Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | धवलसिंहांचा ‘डोळा’ दक्षिणवर, माळशिरस कडे ‘दुर्लक्ष’ | सुरेश हसापुरेंचा तिरस्कार तर पक्षात क्रेझ नसलेल्याना दिली पदे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून धवलसिंह मोहिते-पाटील यांची एन्ट्री. त्यामुळे काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी चर्चा सुरू झाली त्या पद्धतीने सुरवातीचे दोन-तीन महिने धवलसिंह मोहिते यांनी जिल्ह्यात दौरे केले, आढावा घेतला, बैठका घेतल्या, पदाधिकारी निवडी साठी मुलाखती घेतल्या. त्यानंतर बसवराज बगले यांनी केलेले नेत्यांविरोधात आंदोलन. यामुळे नेत्यांची प्रतिमा मलिन झाली त्याचा फटका बगले यांना बसला.साहेबांनी जनवात्सल्य निवासस्थानी बोलावून झापले, झापल्याचा राग मनात धरून बगले यांनी काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हातात बांधले. नक्कीच या सर्व घडामोडींत मागे कोणाचा तरी हात असावा असा संशय काँग्रेसमध्ये व्यक्त करण्यात आला.

 या पार्श्‍वभूमीवर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या. अकरा तालुका अध्यक्ष नेमले, विशेष म्हणजे जिल्ह्यातील दोन कार्यकारी अध्यक्षपदे त्यांनी काढली. सुरेश हसापुरे यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पद दिले, यावरून हसापुरे यांचा तिरस्कार किती आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आठ प्रमुख पदे देण्यात आली आहेत त्यामध्ये काँग्रेस भवनात यापूर्वी कधीही न दिसलेले पक्षविरोधी काम करणारे अशा लोकांना मोठी पदे देण्यात आल्याची चर्चा आता काँग्रेस भवनातून ऐकण्यास मिळत आहे. काँग्रेस मध्ये येऊन एक महिना सुद्धा झाला नाही अशा रमेश हसापुरे सारख्या नवख्या कार्यकर्त्याला जिल्हा संघटक हे पद मोठे दिले यावरून ही सुरेश हसापुरे यांच्याबाबतचा तिरस्कार दिसून येतो. भीमाशंकर जमादार, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, मोतीलाल चव्हाण, मल्लेश बिडवे, सुधीर लांडे, भीमराव बाळगे यांना मोठ्या पदावर संधी देण्यात आली आहे. यातील काही नेते तर भाजपचे नेते सिद्रामप्पा पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत,  सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात काम करणारे असल्याची कुरबुर म्हेत्रे समर्थकांकडून ऐकण्यास मिळते. बसवराज बगले यांच्या मागेपुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठ्या पदाचे वाटप झाले असून पदे निवडीपाठीमागे बसवराज बगले यांचाच ‘हात’ असल्याची चर्चा आता काँग्रेस भवनात ऐकण्यास मिळत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सर्वाधिक पदे दक्षिण तालुक्याला दिली आहेत हे या निवडीवरून स्पष्ट होते मात्र नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यात एकही काँग्रेसचा नगरसेवक निवडून आला नाही त्या तालुक्यात काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं बोललं जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | आरोग्य मंत्री राजेश टोपे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या भगिनी पंचशीला आखाडे झाल्या सरपंच ; बिनविरोध निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या भगिनी पंचशीला आखाडे झाल्या सरपंच ; बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986404
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group