सर असे का ! माढयात निंबाळकरांना विरोध, सोलापुरात सातपुते यांचे स्वागत ; शिवसेनेच्या शिवाजी सावंतांनी ही दिली प्रतिक्रिया
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने पुनश्चिम उमेदवारी दिली आहे परंतु या मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे.
माढ्यामधील एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे आपला विरोध बोलून दाखवला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या सातपुते यांचे शिवाजीराव सावंत यांनी स्वागत करत त्यांचे कौतुक केले यावेळी बोलताना भाजपला जो लीड मिळेल तो शिवसेनेचा असेल असा दावा यावेळी केला.
यानंतर पत्रकारांनी माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध आणि सोलापुरात सातपुते यांचे स्वागत का? असा प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे माणसातील नाहीत, त्यांनी आजपर्यंत मतदारसंघाचा किती विकास केला? कधी ते जनसामान्य माणसाला भेटत सुद्धा नाहीत, त्यामुळे अशा माणसाला आमचा विरोध आहे परंतु सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्यात फरक आहे. ते आपल्या माळशिरस मतदारसंघात प्रचंड काम करतात, जनसामान्य माणसांशी त्यांची नाळ जोडलेली आहे अशा उमेदवाराचे आम्ही स्वागत करतो.