आमदार सुभाष देशमुख गटाला धक्का ; सरपंच व उपसरपंच दिलीप मानेंच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात
येळेगाव ता द सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख गटाचे विद्यमान सरपंच संजीवकुमार लोणारी व उपसरपंच मेहबूब शेख यांचा काँग्रेस मध्ये दिलीप माने यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे.
येळेगाव येथील सरपंच संजीव कुमार लोणारी उपसरपंच महिबूब शेख तंटामुक्त अध्यक्ष महादेव पाटील आदिनी काँग्रेस मध्ये दिलीप माने यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. यावेळी समवेत ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँकेचे संचालक गंगाधर बिराजदार, विंचूरचे विद्यमान सरपंच बाळासाहेब पाटील उपस्थित होते. दरम्यान ब्रह्मदेव दादा माने बँकेत दिलीप माने यांनी लोणारी व शेख यांचा सत्कार केला.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्य पद्धतीला कंटाळून काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे लोणारी व शेख यांनी सांगितले.