मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व राजलक्ष्मी सामाजिक संस्था महिला सक्षमीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एअर सर्व्हिसेस मध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
स्कायझोन एविएशन इंस्टिट्युट यांच्या सहकार्याने हा मोफत सेमिनार होत आहे.
या सेमिनार साठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरू झाली असून 19 जून 2025 ही नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे. नाव नोंदणी पूर्ण झाल्यावर सेमिनारची तारीख, ठिकाण आणि वेळ ही 9765066660 या व्हाटस अप नंबर वरून कळविण्यात येणार आहे.
एका चांगल्या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी सोलापूरच्या विद्यार्थ्यांना असून त्यांनी या सेमिनार मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती यांनी केले आहे.