सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी निमंत्रक म्हणून नव्या दहा सदस्यांची उपस्थिती लागली. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचा सहभाग होता. जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक आणि त्यामध्ये काळजे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आपले विषय मांडले. आपले विषय मांडताना त्यांनी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते.
काळजे यांनी सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेली मंजुरी 4,465 इतकी असून लाभार्थ्यांना लाभ दिला जात नाही. अनेक वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहेत. अधिकारी कागद पत्रांसाठी अडवणूक करतात, सर्व महापुरूषांच्या जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना देण्यात येणारा वेळ हा समान म्हणजे रात्री १२ वा. पर्यंतचा असावा,
सोलापूर जिल्हयातील ई-महासेवा केंद्र जे ५ वर्ष जुने आहेत. त्यांच्या परवानग्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत. ते पुरवत सुरू कराव्यात,
सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा अनेक वर्षांपासून दिल्या गेल्या नाहीत. यावर काय कार्यवाही करणार असे प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून याची उत्तरेही जाणून घेतली.