सोलापूर : गुरुवारी झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठकी विरोधी आमदारविना झाल्याचे पाहायला मिळाले. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे एकमेव विरोधक उपस्थित होते. तेही काही वेळाने बैठकीला आले. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा बैठकीला नव्हत्या. त्यामुळे सोलापूर शहराचे प्रश्न आता कोण मांडणार अशी चर्चा पत्रकारांमध्ये होती.
सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न तसेच होटगी रोड विमानतळावरील विमान सेवेचा प्रश्न यावेळी उपस्थित केला. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीची समांतर जलवाहिनीची नेमकी काय परिस्थिती आहे येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे केले तसेच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर विमानसेवा सुरू होणार होती त्याचे काय झाले.
असे दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न अमोल शिंदे यांनी उपस्थित केले.
समांतर जलवाहिनीच्या कामकाजाची माहिती महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी उपस्थित सभागृहाला दिली तर विमानसेवेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले.