सोलापूर : बाबरी मशीद पाडकामाच्या कार्यात म्हणजेच कारसेवेमध्ये महत्वाच्या भूमिका बजावलेल्या साध्वी ऋतम्भरा यांची भेट त्यांच्या वृंदावन येथील वात्सल्य ग्राम आश्रमात श्रीराम जन्मोत्सव समिती च्या संस्थापक सदस्य तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतिराज होनमाने, अक्षय अंजिखाने व संदीप महाले यांनी यावेळी घेतली.
सोलापुरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या हिंदुत्वाच्या कार्याची माहिती साध्वीजीना दिली. यावेळी त्यांना श्रीरामनवमीला भागवत कथेसाठी येण्याचे निमंत्रण ही देण्यात आले. त्यांनी ही सोलापूरला येण्यासंबधी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कळवण्यात येईल असे यावेळी यतिराज होनमाने यांना सांगितले.