Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आडम मास्तर….. अभिनंदन ! रे नगरचा बिगर सिंचन पाणी वापर अभूतपूर्व करार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 January 2024
in Social
0
आडम मास्तर….. अभिनंदन ! रे नगरचा बिगर सिंचन पाणी वापर अभूतपूर्व करार
0
SHARES
578
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.२:- कुंभारी येथे सोलापूर शहरातील ३० हजार असंघटीत कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज २ जानेवारी २०२४ रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे.

या करारामुळे रे नगर वसाहतीला दररोज २४ एमएलडी पाणी एनटीपीसी कडून मिळणार आहे. या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून १६ एमएलडी पाणी एनटीपीसी ला परत पुरवठा करावयाचे आहे. हा करार अभूतपूर्व व ऐतिहासिक करार असून या करारान्वये लाभार्थ्यांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनानेही याची दखल घेऊन लाभार्थ्यांकारिता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे. केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार लाभार्थ्यांच्या वतीने, रे नगर फेडरेशनच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सिंचन भवन, सोलापूर येथे व्यक्त केले.

मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता धीरज साळे व रे नगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला. यावेळी रे नगर फेडरेशनचे मुख्यप्रवर्तक, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी कराराच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केले व मा. कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले.

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कुंभारी येथे ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याचे पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान मा. नरेद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे.

या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम, शाखा अभियंता योगेश मोरे, वसंत विहार प्रा.लि. चे मेहुल मुळे, संदीप झाकणे, कुर्मय्या म्हेत्रे, गजेंद्र दंडी, ॲड.अनिल वासम ,विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, वीरेंद पद्मा, नरेश दुगाणे, बाळकृष्ण मल्याळ, शाम आडम आदींची उपस्थिती होती.

Tags: Adam masterPM ModiRe nagar
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सुरू ; लिंगायत समाजाच्या नेत्यांनी दिली भेट

Next Post

साध्वी ऋतंभरा यांची सोलापूरच्या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी घेतली भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
साध्वी ऋतंभरा यांची सोलापूरच्या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी घेतली भेट

साध्वी ऋतंभरा यांची सोलापूरच्या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998298
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group