राम सातपुते यांनी घेतली सोलापुरातील विटभट्टी व्यावसायिकांची भेट ; दिली ही ग्वाही
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील विटभट्टी व्यावसायिक बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विटभट्टी व्यावसायिक शहर अध्यक्ष सिद्रामप्पा तंबाके यांनी याप्रसंगी भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते स्वागत व सत्कार करून लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल मनापासून समाधान व्यक्त करत माझ्या लोकसभा उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सातपुते यांनी माझ्या उमेदवारीला पर्यायाने मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाला दिलेल्या या पाठिंब्याबद्दल सिद्रामप्पा तंबाके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. सोलापूर मतदारसंघातील विटभट्टी व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आगामी काळात मी नेहमीच कटिबद्ध असेल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी सोमनाथ केंगनाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख, महादेव बर्कुडे, रवि विटकर, कुमार केगणाळकर, शरणाप्पा मद्री, शिवाजी जमादार, प्रकाश महित्रे, शिवानंद हिरेमठ, संगप्पा हाग्रे, रवि हुल्ले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.