राम सातपुते व रणजितसिंह निंबाळकर भरणार 16 एप्रिलला अर्ज ; देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
सोलापूर : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व माढा हे दोन्ही मतदारसंघ असून दिनांक 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
भारतीय जनता पार्टी महायुती आघाडी कडून सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार येत्या 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाकडून मिळाली. विशेष म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार राम सातपुते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते मानले जातात. ही निवडणूक फडणवीस यांच्याही प्रतिष्ठेची आहे.
सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार असल्याने यंदाच्या सोलापूरच्या निवडणूकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे. त्याच बरोबर माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील बंडखोरीच्या तयारीत असल्याने ती निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.