धैर्यशील मोहितेंचा राजीनामा स्वीकारला, आम्ही आमची निवडणूक लढवणार ; रणजितसिंह मोहितेंबद्दल काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सोलापुरात आहेत.
सोलापुरात माध्यमांनी बावनकुळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सदस्य पदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारला असल्याचे सांगितले आता आम्ही आमची निवडणूक लढवणार असे सांगून भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र महायुती सोबतच राहतील असा दावाही त्यांनी केला. दरम्यान काय म्हणाले बावनकुळे पहा…