राम, हनुमान, रावण अवतरले सोलापूर जिल्हा परिषदेसमोर ; कुणीतरी लक्ष द्या रे आमच्याकडे
सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर आयोध्यातील श्रीराम मंदिर पूर्ण करून त्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये जय श्री राम हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम, हनुमान, लक्ष्मण, रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत काही कलावंत अचानक अवतरले. रस्त्यावरून जाणारे येणारे प्रत्येक जण तिकडे पाहत होते.
परंतु हे सर्व जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर काय करत आहेत. हे जेव्हा जाणून घेण्यात आले तेव्हा हे सर्व शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेचे सदस्य होते.
त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या वेशभूषेमध्ये आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी माहिती दिली की, वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणे कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान 5000 मानधन करावे केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे कलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यात घ्यावी 2020 पासून प्रलंबित प्रकरणे मंजूर करावी या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सांगितले.