सोलापूर विमानतळाचे शानदार लोकार्पण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोलापूर बाबत हे मोठे स्टेटमेंट
सोलापूर : नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीने एका शानदार कार्यक्रमात लोकार्पण झाले.
सोलापूर विमानतळावर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, माजी खासदार डॉक्टर जयासिध्देश्र्वर स्वामी, वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह सोलापुरातील व्यवसाय उद्योजक विविध क्षेत्रातील ठराविक मान्यवरांची उपस्थिती होती.
पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर विमानतळा सह विकास प्रकल्पांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले.
उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा प्रेमळ उपहार मिळाला आहे. सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे. तिथल्या टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढवली गेल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत.
देश विदेशातून प्रत्येक स्तरातून भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे. यामुळे सोलापूर मध्ये व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.