संतोष पवार, किसन जाधवांसह उमेश पाटील समर्थक ही राजन पाटलांच्या सत्काराला ; मोहोळचे मालक म्हणून बांधला फेटा
मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातून त्यांचे सत्कार होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते हेमंत चौधरी, व्हीव्हीपी कॉलेजचे अमोल चव्हाण, जिल्हा दूध संघ व्हॉईस चेअरमन दीपक माळी, अनिल कादे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी अनगर येथे जाऊन राजन पाटील यांचा “मोहोळचे मालक” हा भरजरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून सत्कार केला. या निवड प्रक्रियेबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड यांची उपस्थिती होती.