प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख झाले जॉईन ; तातडीने विभागाला दिल्या या सूचना
सोलापूर : जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता पदभार घेतला. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यांचे स्वागत केले. तब्बल सोळा महिन्या नंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षण अधिकारी मिळाला आहे.
सकाळी चार हुतात्मा स्मारकासह महापुरुषांना अभिवादन करून ते सोलापूर जिल्हा परिषदेत आले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोणकोणती कामे करावी लागतील याचा आढावा घेतला.
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी शेख यांचा सत्कार केला. महापालिका शिक्षण मंडळात ते यापूर्वी दोन वर्ष प्रशासनाधिकारी होते, त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे संचालक भालचंद्र साखरे यांच्यासोबत येऊन स्वागत केले.
सोलापूर शहर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे तातडीने समायोजन करण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.