प्रणिती कधीच मंत्री झाली असती पण मी….., सुशीलकुमार शिंदे यांनी काय सांगितले ; ‘प्रणिती इज फायटर’
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य कार्यकारिणीचे सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांना प्रणिती शिंदे यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल का? असा प्रश्न केला असता मी प्रणितीकडे मुख्यमंत्री म्हणून कधीच पाहिले नाही, ती पहिल्या निवडणुकीत विजयी झाली, विधानसभा ही लोकशाही मधली शाळा आहे, तिला मंत्री व्हायची संधी होती, मी नको म्हणालो, अनुभव आवश्यक आहे, प्रश्न समजून घेतले पाहिजे, त्यावेळेस माझ्याकडे तिला मंत्री करण्याची पावर होती परंतु मी तसे केले नाही असे शिंदे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देऊन आपण पुन्हा घराणेशाहीला चालना दिली असे वाटत नाही का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले प्रणिती शिंदेला लोकसभेची उमेदवारी मी दिली नाही तिला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उमेदवारी दिली आहे. ती त्या उमेदवारीला नायक आहे, ती फायटर आहे, विचारवंत आहे, नवीन शोधण्याची तिला सवय आहे, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मधून प्रणिती शिंदे आणि माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चित विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, त्यांच्याकडे नवीन प्लॅनिंग नाही, 2014 साली सोलापुरातील कपड्याचे देशातील मिलिटरी ला ड्रेस शिवण्याची घोषणा मोदी यांनी केली होती परंतु दहा वर्षात त्यांनी काही केले नाही त्यामुळे सोलापुरातला हॅण्डलूम व्यवसाय बसून आहे, जेव्हा गॅरंटी म्हणतो तेव्हा ती संपली असते, दहा वर्षात काय केले असा सवाल करत त्यांच्याकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत केवळ हिंदुत्ववादी विचार घेऊन बोलतात, इतर समाजाचा विचार का करीत नाहीत, पंतप्रधान हा सर्वांचा असतो .
पायल गांधी डिजिटल संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष तर राजाराम मस्के जिल्हा संघटक
डिजिटल माध्यमांमध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या करमाळा येथील पायल गांधी यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली तसेच राजाराम मस्के यांची या संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.