“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !
सोलापूर : शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील मंजूर झालेल्या घरकुलच्या जागेवरून खासदार प्रणिती शिंदे, मोहोळचे आमदार राजू खरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
हा मुद्दा राजू खरे यांनी उपस्थित करताना मोहोळ तालुक्यात अनेक लाभार्थी जागा नसल्याने वंचित आहेत, त्यांना खरेच घरे मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खरे यांची तळमळ पाहता मोहोळ तालुक्यात किती लाभार्थी संख्या जागेपासून वंचित असल्याची माहिती प्रशासनाला विचारली.
याच दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ही केवळ घोषणाबाजी आणि मार्केटिंग साठी ठीक आहे पण घरकुल मंजूर होऊन जातात जागा नाही. तुमची पुढील प्रक्रिया काय असणार आहे, घरकुलांचे अतिक्रमण काढा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे पण सरकारने त्या विरोधात अपिल केली आहे का? तुम्ही जागा देण्यासाठी काय करणार? असे प्रश्न उपस्थित केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले की, 134 लोकांना केवळ एक रुपये प्रति चौरस फूट जागा दिली आहे, 1009 लोकांना 31 मे पर्यंत जागा देणार आहोत. 2013 लोकांना नाहरकत दिले आहे.
दरम्यान पर्यंत शिंदे यांच्या त्या शब्दांवर पालकमंत्री यांनी काहीशी नाराजी व्यक्त करताना प्रणिती ताई मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण हे सर्व मार्केटिंग साठी नाही हा गोड गैरसमज काढून टाका. महाराष्ट्राला पहिल्यांदाच वीस लाख घरे मंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील यंत्रणा प्रचंड स्ट्रॉंग लावली आहे त्यामुळे यातला एकही लाभार्थी घरापासून वंचित राहणार नाही जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून मी इथे ठामपणे सांगतो.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही पालकमंत्र्यांची बाजू घेताना राज्यात एवढी घरकुले पालकमंत्री गोरे यांच्या प्रयत्नातून मिळाले आहेत जागा नसेल तर पैसे देऊन लाभार्थ्यांना घर देणार आहोत त्यासाठी आमच्याही तालुक्यात प्रशासन कामाला लागले आहे. शासनाचा हा निर्णय अभिनंदनास पात्र आहे.