प्रणिती शिंदे | मग बघा भाजपचा ‘गेम ओव्हर’ ; म्हेत्रेंच्या अक्कलकोट मध्ये काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद ; सभांना उसळली गर्दी
महागाई, रोजगार, महिलांवरील अत्याचार, पीक विमा, दुधाला दर, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे कांदा फेकून द्यावा लागत आहे. भाजपने फसविल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत म्हणून दहा वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाडा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केला आहे, भाजपला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसच्या सोबत रहा असे आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले.
तर या सभेत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बक्कानुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांनी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.
सोलापुर 42 लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट विधानसभेतील एक मुख्य गाव सलगर मध्ये काँग्रेसचे आधिकृत उमेदवार प्रणिति शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेस हजारोंची उपस्थिती होती.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जिप गटातील गावात गावभेट दौऱ्याचा प्रथम दिवशी हैद्रा, उडगी, कलप्पावाडी, सातनदुधनी, तळेवाड, बबलाद, आंदेवाडी, सिन्नुर, दुधनी तांडा, मुगळी, इब्राहीमपुर, नागौर, मिरजगी, बोरी उमरगे, हत्तीकणबस, चिक्केहळी, स्लगर या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि मौजे सलगर येथे शेवटी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या गावभेट दौरा आणि जाहिर सभेस शिवसेना ठाकरे गट ता प्रमुख आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे बंदेनवाज कोरबु, काँग्रेस ता अध्यक्ष शंकर म्हेत्रें, काँग्रेस कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी, जेष्ठ नेते मल्लीकार्जुन काटगाव, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, सलगरचे सरपंच ज्योती डोगंराजे, महिला काँग्रेस ता अध्यक्षा शितल म्हेत्रे, माया जाधव, सुरेखा पाटील, सलगर माजी सरपंच सुरेखा गुडंरगी, माजी सभापती आनंद सोनकांबळे, शिवानंद बिराजदार, यु ता अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, सातलिंग गुडंरगी, युवा नेते प्रविण शटगार, उपसरपंच काशिनाथ कुंभार, संजय डोंगराजे, इक्बाल बिराजदार, इरणा धसाडे, महादेव चूंगी, अर्जुन जमादार, सातलिंग शटगार, गुरूनाथ कालीबत्ते, रफिक पटेल, रमेश डोंगराजे, अरविंद म्हेत्रे, संदिप फुलारी, सलगर गावासह पंचक्रोशीतील माता भगिनीसह नागरिक बाधंव मोठ्या बहुसंख्येत उपस्थित होते.