राम सातपुते यांनी मोहोळ तालुका पिंजून काढला ! मोहोळच्या सावलीत भेटले उमेशदादा तर नरखेडच्या वाड्यात संतोष अण्णा ; यशवंत तात्या, मनोहर भाऊंच्याही झाल्या भेटी
सोलापूर : भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी शुक्रवारी अख्खा मोहोळ तालुका पिंजून काढला. या तालुक्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. सातपुते यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
या भेटीचा श्रीगणेशा अर्थातच माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीतून केला होता. शुक्रवारी त्यांनी ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांच्या शेटफळ या गावातील निवासस्थानी भेट घेतली. त्याठिकाणी माजी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी स्वागत केले.
मोहोळच्या सावली बंगल्यात राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची सातपुते यांनी भेट घेतली, त्याठिकाणी उपाध्यक्ष महेश कुलकर्णी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, ओंकार हजारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, मानाजी माने, राहुल क्षीरसागर यांनी स्वागत केले.
नरखेडच्या वाड्यावर भाजप नेते संतोष पाटील यांची भेट राम सातपुते यांनी घेतली. गावातून वाजत गाजत त्यांची मिरवणुक काढून सत्कार करण्यात आला.
मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आमदार यशवंत माने यांची भेट घेतली, पेनुर मध्ये मानाजी बापू माने, कामती येथे दिपक माळी, मोहोळ शहरात जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे नेते नागनाथ क्षीरसागर, माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, शहाजहान शेख, हिम्मतराव पाटील, सुनील चव्हाण, नागनाथ मोहिते, शिवाजी गुंड पाटील, सागर चवरे, अंकुश आवताडे यांच्या भेटी घेतल्या, सौंदणे या गावी मोठी सभा झाली.