ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार
सोलापुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील शहर कार्याध्यक्ष तोफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्यांचे नेते वसीम बुरहान यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा प्रवेश मुंबई मध्ये मंत्री भरणे यांच्या सिंहगड या निवासस्थानी संपन्न झाला. भरणे मामा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला हा जोरदार धक्का मानला जात आहे.
तौफिक शेख यांच्यासह माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी, माजी नगरसेविका तसलीम शेख, माजी नगरसेविका वाहिदाबी शेख, माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांच्यासह अकिबराजे शेख, जावेद वास्तव, शोहेब शेख, अकील नाईकवाडी, युन्नूस शेख, नैरुद्दीन मुल्ला असे दहा जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.