प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
सोलापूर – सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत १८ लाख २८ हजार रुपये खर्चित येथे यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी एजाज शेख, महबूब पठाण, इरफान शेख, बिलाल शेख इमरान मंडपवाले जुबेर शेख, जमीर शेख,मोहीम शेख, कुरेशी, निराशा शेख, मीराशाब शेख, उमर शेख, जब्बार शेख,, सय्यद चाचा, सद्दाम शेख, केशरबाई मणियार, शामला जाधव,अन्नपूर्णा जाधव, शहजाद शेख,मालानबी शेख, बिलाल शेख, रियाज शेख, सलीम शेख, महादेव राठोड,वसंत कांबळे,फिरोज पठाण, आनंद गाडेकर, सुहास सर जाधव आदींच्या उपस्थितीत या रस्ता कामाचे विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आले.
प्रभाग क्रमांक 22 मधील यतिम खाना परिसरात बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला मुर्त स्वरूप प्राप्त झाले. येथील रहिवाशांच्या मागणीनुसार रस्ता कामाचे आज शुभारंभ करण्यात आले.
रखडलेल्या रस्त्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे पावसाळ्यात साचणारे पाणी चिखल खड्डे आणि वाहनधारकांचे अपघात यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे विकास कामांमध्ये गुणवत्ता हा सर्वोच्च निकष असावा ठेकेदारांनी कोणतेही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करावे असा सल्ला देखील यावेळी ठेकेदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी या शुभारंभ प्रसंगी दिले.