मोहिते पाटलांचा माळशिरस लीड यंदा ‘डाऊन’ होणार ; भाजपच्या या नेत्याचा दावा ; म्हणे माढा, करमाळ्यातून NCP ला लीड
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यंदा 2019 मधील भाजप सोबत गेलेले मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात जाऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली आहे.
मोहिते पाटलांनी यंदा भाजपकडून उमेदवारी मागितली परंतु विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तिकीट मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी बंडखोरी करण्याचे ठरवले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील चारही आमदार विरोधात असताना मोहिते पाटलांनी ही निवडणूक लढवली. 2019 ला तब्बल एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य निंबाळकर यांना माळशिरस तालुक्याने दिले होते, त्यामुळे यंदा माळशिरस धैर्यशील मोहिते पाटील यांना किती मताधिक्य देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान माढा मतदारसंघाची जबाबदारी दिलेल्या भाजप नेते संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदा माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटलांचे मताधिक्य घटणार आहे त्यामागील कारण ही त्यांनी सांगितले मात्र करमाळा आणि माढा तालुक्यातून राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल असे सांगताना दोन्ही तालुक्यातील मराठा समाज राष्ट्रवादीसोबत गेला त्याला कारण जरांगे पाटील होते असा दावा त्यांनी केला आहे. नक्की काय म्हणाले पाटील पहा