मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहन कदम यांनी नुकतीच भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट दिली.
सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोशल सायन्स सोलापूरचे संचालक डॉ. एस.बी.सावंत यांनी मोहन कदम यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक दीपक भोसले, जगन्नाथ माळी व तानाजी शिंदे यांचा सत्कार संचालक डॉ. एस बी सावंत यांनी केला. उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यानंतर मोहन कदम यांनी शैक्षणिक संकुल सोलापूर मधील भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, ग. सा. पवार प्राथमिक शाळा, भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर व भारती सहकारी बँक, अशा विविध शाखांना भेट दिली व तिथे चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कदम यांनी भारती विद्यापीठाची भविष्यातील वाटचाल, शिक्षण क्षेत्रा समोरील आव्हाने व शिक्षकांची भूमिका अशा विविध विषयांवर आपले मत प्रकट केले. यावेळी भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मांडके, ग. सा. पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे, भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका मोहोळ, भारती सहकारी बँकेचे व्यवस्थापक हत्याळीकर तसेच संकुलातील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.