सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी अनेक महत्त्वाचे विषय मांडले. त्यामध्ये शहरातील छत्रपती संभाजी तलाव सुशोभिकरण व मनोरंजन केंद्र करिता निधी देण्याची मागणी केली,
मंद्रूपला ट्रामा केअर सेंटर जागा उपलब्ध करून देणे, जुळे सोलापूर भागात नाट्यगृह केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, जुळे सोलापूर भागात दुसरे एसटी स्टँड करावे, सीमावरती भागातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे त्या स्टोरीज शासनास सादर करणे बाबत निर्देश देण्याची मागणी केली. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, जिल्हा परिषद समाज कल्याण मधील नागरी वस्ती सुधार योजनेचा थकीत निधी व्यवस्थित खर्ची पडावा अशी मागणी त्यांनी केली.
आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या मागण्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक घेताना प्रशासनाला तातडीने आदेश दिले.