मला भेटायला कुठल्या चिट्ठीची गरज लागणार नाही ; आमदार राम सातपुते यांचा विरोधकांना चिमटा
सोलापूर : भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे मंगळवारी मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. मंगळवेढ्यात पांडुरंग परिवाराच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका करताना मला भेटायला आलेल्या नागरिक कार्यकर्त्यांना कुठल्याही चिट्ठीची अथवा फॉर्म भरण्याची गरज लागणार नाही या शब्दात विरोधकांवर तोंडसुख घेतले.
यावेळी बोलताना राम सातपुते म्हणाले, मी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तुमच्या सारखाच पक्षाचे काम करताना या पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मला जाण आहे. मी माळशिरस तालुक्यात काम करताना सर्वसामान्य नागरिक कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. मला भेटायला आलेल्या एकाही कार्यकर्ता किंवा नागरिकांना कुठल्याही चिट्ठीची गरज भासू दिली नाही ते थेट मला भेटू शकतात ,मी सर्वांसाठीच उपलब्ध राहीन असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.